पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 19 October 2026 | 👁 137 Views
पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष
सांगली, दि. 19 - येत्या 23 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी आणि त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 22 व 23 ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व राजकीय जाहिरातींना माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे (MCMC) प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संस्था किंवा व्यक्ती यांना मुद्रित माध्यमांमध्ये जाहिरात द्यायची असल्यास ती अगोदर प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे.
जाहिरात प्रमाणित करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, माध्यम कक्ष, जिल्हास्तरीय MCMC समिती, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली येथे अर्ज सादर करावा लागणार आहे.
तसेच, सर्व वृत्तपत्र संस्थांनी देखील MCMC प्रमाणित असल्याची खात्री केल्याशिवाय कोणतीही राजकीय जाहिरात प्रकाशित करू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष | *जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर मोठा अपघात तीन चुलतभावांचा मृत्यू….* | सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे : प्रचारसभेत आवाहन | रामटेकमध्ये श्री दुर्गा माता दौड उत्साहात संपन्न; सकल हिंदू समाजाचा पुढाकार | आमडी गावातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश | शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदणी पूर्ण करावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन | न्यायालयाच्या दारातच न्यायासाठी लढा: भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे ‘काळी फीत’ लावून मूक आंदोलन | वागदर्दी धरणात दुर्दैवी घटना; बैल धुण्यासाठी गेलेल्या डोणगावच्या राहुल सोमसे यांचा मृत्यू | आईने २० रुपये दिले नाहीत; रामटेक तालुक्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू |