राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; गुन्हे व जप्तीमध्ये वाढ

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 30 April 2026 | 👁 165 Views
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; गुन्हे व जप्तीमध्ये वाढ


दैनिक आखूर l सोलापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात कडक कारवाई करत 2024-25 या कालावधीत मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल केले असून जप्तीमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.

2023-24 या वर्षात एकूण 2963 गुन्हे नोंदवण्यात आले होते, तर 2024-25 मध्ये ही संख्या वाढून 3077 वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे वॉरंटची संख्या 2483 वरून 2601 पर्यंत वाढली आहे. बेवारस प्रकरणांमध्येही वाढ दिसून येत असून 190 वरून 224 इतकी नोंद झाली आहे. अटक आरोपींची संख्या 2288 वरून 2522 झाली असून, यावरून विभागाची कारवाई अधिक प्रभावी झाल्याचे स्पष्ट होते.

जप्तीच्या बाबतीतही मोठी वाढ झाली आहे. देशी दारू, विदेशी दारू व बिअर यांच्या जप्तीमध्ये वाढ झाली असून, एकूण परराज्यातील मद्य जप्तीचे प्रमाणही वाढले आहे. तसेच वाहने जप्त करण्याच्या कारवाईतही वाढ दिसून येते. 2023-24 मध्ये 5482 वाहनांची जप्ती करण्यात आली होती, तर 2024-25 मध्ये ती संख्या 6702 पर्यंत पोहोचली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर आळा बसण्यास मदत होत असून, शासनाच्या महसुलातही वाढ होण्याची शक्यता आहे. विभागाकडून सतत छापे, गस्त आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाया केल्या जात आहेत.

दरम्यान, नागरिकांनी अवैध मद्यनिर्मिती किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास तत्काळ विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कारवायांमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असून, भविष्यातही अशीच कठोर भूमिका कायम ठेवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष |