दांडेलीच्या लग्नवारीत भीषण अपघात! मळेवाड येथे इर्टिगा रस्त्याच्या कडेला आदळली; तीन गंभीर, पाच जखमी

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 15 May 2026 | 👁 114 Views
दांडेलीच्या लग्नवारीत भीषण अपघात! मळेवाड येथे इर्टिगा रस्त्याच्या कडेला आदळली; तीन गंभीर, पाच जखमी
वेंगुर्ल्याहून दांडेली येथे लग्नसमारंभासाठी निघालेल्या मारुती इर्टिगा कारला मळेवाड-जांभळीचे भरड येथे भीषण अपघात झाला. सरळ रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. अपघात इतका जोरदार होता की गाडीतील एअरबॅगही उघडल्या. या दुर्घटनेत तीन जण गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.
या अपघातात दिया रमेश पाटकर (18) हिच्या हाताला, रमेश साबाजी शेगले (52) यांच्या डाव्या पायाला तसेच नम्रता वल्लभ शिरगावकर (27) यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे.
तर वंदना वल्लभ शिरगावकर (50), रचना रमेश शेगले (45), मनस्वी रमेश पाटकर (16), वल्लभ जयदेव शिरगावकर (58) आणि चालक संजय एकनाथ भाटकर (46, सर्व रा. वेंगुर्ले) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
हे सर्वजण दांडेली येथे लग्नसमारंभासाठी जात असताना हा अपघात घडला. अपघात नेमका कशामुळे झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांना प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |