"आमदार बाबासाहेब देशमुख यांना पितृशोक हजारोंच्या उपस्थितीत अंत्ययात्रा"
👤 रघुनाथ देवकर माळशिरस |
📅
12 May 2026 |
👁 18 Views
सहा दशकं सांगोला विधानसभेच्या माध्यमातून लोकशाहीच्या दरबारात लोकप्रतिनिधी म्हणून नाव लौकिक मिळविला आणि आपल्या कार्याचा ठसा राज्यभर पसरविला असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र सध्याच्या सांगोला विधानसभेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीत्व सांभाळत असलेल्या आदरणीय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे वडील आण्णासाहेब उर्फ पोपटराव देशमुख यांचे वयाच्या साठाव्या 65 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या दुःखद निधनाची बातमी समजताच सांगोला तालुका पेनुर तालुका त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील त्यांचे स्नेही, आप्तेष्ट ,नातेवाईक, मित्रमंडळी, सगे सोयरे, व लोकप्रतिनिधी, राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी संस्कृती त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पेनुर येथील निवासस्थानी बहुगर्दी केली. पोपटराव उर्फ अण्णासाहेब देशमुख हे शेती प्रिय त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होती. त्यांचा मनमिळावू स्वभाव वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या जाण्याने सर्व क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे अनेकांच्या चर्चेतून सूर निघत होता. हजारोंच्या समुदायाने अंत्ययात्रेमध्ये सहभाग नोंदवला होता.तर तुमच्या जीवनातील अनेक पैलू अंत्ययात्रेच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषणातून अनेकांनी व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने मोठी शोककळा पसरल्याचे दिसून आले. त्यांच्या पश्चात आई पत्नी , विवाहित मुलगा, भाऊ, भावजय, पुतणे, सुना, जावई, नातवंडे, बहिणी असा मोठा परिवार आहे.