अध्यक्षपदी भास्कर म्हसे तर सचिवपदी वीरेंद्र दुमाडा यांची निवड करण्यात आली. तसेच वंदना घाटाळ (कोषाध्यक्ष), गीता दौडा व सुदाम गोरखाना (उपाध्यक्ष), प्रतिक वेडगा व तेजस घाटाळ (सहसचिव), संतोष कोम व अनिकेत धांगडा (सचिव मंडळ सदस्य), अंकिता धोडी (निमंत्रित सचिव मंडळ सदस्य) यांच्यासह मनान शेख, राहुल वळंबा, कल्पेश थापड, तन्वी दौडा, नितिन कानल, कल्पेश कोम, शुभांगी राबड, मोनिका दुमाडा, शुभांगी घुटे, करुणा फडवळे, अनिल भवर स्वप्नील कुवरा, विजय घाटाळ, तेजस भोईर, जयेश चौधरी यांची सदस्य म्हणून निवड
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) 9 वे ठाणे पालघर जिल्हा अधिवेशन दि. 27 व 28 जून रोजी तलासरी शहरात मोठ्या उत्साहात पार पडले. कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालय, तलासरी येथून कॉम्रेड गोदावरी परुळेकर चौक ब्रिज पर्यंत रॅली काढून सभा घेण्यात आली. सभेनंतर एसएफआय चा ध्वज फडकवण्यात आला तसेच शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून अभिवादन करण्यात आले.
अधिवेशनाचे उद्घाटन डहाणू मतदार संघाचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले, एसएफआय च्या माजी नेत्या तसेच जनवादी महिला संघटनेच्या नेत्या, व डीवायएफआय नेते तसेच तलासरी नागराध्यक्ष सुरेश भोये यांच्या हस्ते झाले. शिक्षणाचे बाजारीकरण, धर्मांधता व केंद्रीकरण या मुद्द्यांवर भाष्य करत विद्यार्थ्यांना संघर्षाचे आवाहन केले. अधिवेशनास किसान सभेचे नेते किरण गहला, जानवादी महिला संघटनेच्या नेत्या सुनीता शिंगडा उपस्थित होते. त्यांनी शुभेच्छा दिल्या. एसएफआय चे राज्य सचिव सोमनाथ निर्मळ, उपस्थित विद्यार्थ्यांना चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत अधिवेशनास शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सत्रात शोकप्रस्ताव जिल्हा उपाध्यक्ष गीता दौडा यांनी मांडला, तर आभार प्रदर्शन एसएफआय चे जिल्हा अध्यक्ष भास्कर म्हसे यांनी केले.
या अधिवेशनाने २७ सदस्यांची जिल्हा समिती निवडली असून त्यामध्ये 9 सदस्यांचे सचिव मंडळ निवडण्यात आले. अधिवेशनामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठीचा लढा तीव्र करा, महिलांवर होणाऱ्या अत्याचारविरोधात लढा तीव्र करा!, आश्रम शाळा आणि वसतिगृहातील समस्या सोडवण्याबाबतचा, लढा तीव्र करा, विद्यार्थ्यामधील सोशल मीडिया, व्यसन व वाढत्या आत्महत्याच्या विरोधातील लढा तीव्र करा!, अंधश्रद्धा, धर्माधिकरण, जातीयवाद आणि अस्मितावाद या विरोधातील लढा तीव्र करा, बेरोजगारी विरुद्ध आणि शासकीय पदभरती तात्काळ करण्यात यावी, यासाठी लढा तीव्र करा, NEET परीक्षेत होणारे भेदभाव आणि NEET व TET पेपरफुटी विरोधात लढा तीव्र करा, सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
अधिवेशनाचे निरीक्षण एसएफआयचे राज्य सहसचिव अशोक शेरकर यांनी केले व शेवटी त्यांनी अधिवेशनाची निरीक्षणे मांडली. त्यानंतर नवीन २७ सदस्यांच्या जिल्हा समितीचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. यामध्ये अध्यक्षपदी भास्कर म्हसे तर सचिवपदी वीरेंद्र दुमाडा यांची निवड करण्यात आली. तसेच वंदना घाटाळ (कोषाध्यक्ष), गीता दौडा व सुदाम गोरखाना (उपाध्यक्ष), प्रतिक वेडगा व तेजस घाटाळ (सहसचिव), संतोष कोम व अनिकेत धांगडा (सचिव मंडळ सदस्य), अंकिता धोडी (निमंत्रित सचिव मंडळ सदस्य) यांच्यासह मनान शेख, राहुल वळंबा, कल्पेश थापड, तन्वी दौडा, नितिन कानल, कल्पेश कोम, शुभांगी राबड, मोनिका दुमाडा, शुभांगी घुटे, करुणा फडवळे, अनिल भवर स्वप्नील कुवरा, विजय घाटाळ, तेजस भोईर, जयेश चौधरी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून 3 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.
‘हम होंगे कामयाब’ या गीताने व घोषणा देत उत्साहपूर्ण वातावरणात अधिवेशनाची सांगता झाली.