56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी हीच अण्णासाहेबांसाठी लाख मोलाची शुभेच्छा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 09 August 2026 | 👁 401 Views
56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी हीच अण्णासाहेबांसाठी लाख मोलाची  शुभेच्छा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी ग्राम विकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी तसेच त्यांच्या ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राच्या प्रकाशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टा नगरीला भेट दिली.यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब डांगे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. अण्णासाहेबांनी लिहिलेले ‘आम्रवृक्ष’ हे आत्मचरित्र म्हणजे आरशाप्रमाणे त्यांच्या जीवनाची, घडलेल्या प्रसंगांची जशी आहे तशी प्रतिमा दाखवणारे असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ज्यावेळी या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी चिमणभाऊ डांगे विश्वनाथ बापू माझ्याकडे आले होते, त्यानंतर आप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा काय द्याव्यात, याचा मी विचार करत होतो. त्यावेळी माझ्या लक्षात आले की, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी देऊ शकलो, तर तीच आप्पांसाठी लाखमोलाची शुभेच्छा ठरणार आहे.”
अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिक आणि समाजाच्या विविध घटकांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला.
अण्णासाहेब डांगे यांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा सोहळा आष्टा नगरीसाठी विशेष ठरला. ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राच्या माध्यमातून अण्णासाहेबांच्या प्रदीर्घ जीवनप्रवासाचे विविध पैलू वाचकांसमोर येणार आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |