पर्यावरणप्रेमींशी जॅकी श्रॉफ साधणार संवाद
आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'ट्री आर्मी' या चळवळीने आता गती घेतली आहे. ट्री आर्मीच्या माध्यमातून वृक्षारोपन ही आता चळवळ बनत आहे. या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आता बॉलीवूड स्टार जॅकी श्रॉफ येणार आहे. दि. 4 रोजी सकाळी जॅकी दादांच्या उपस्थितीत गार्डी घानवड सूतगिरणीच्या पाठीमागील जागेत तब्बल साडेचार हजार झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.या उपक्रमाबाबत माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले, जॅकीचे पर्यावरण क्षेत्रात चांगले काम आहे. मात्र ते कधीच समाजापुढे आले नाही. यामुळे रूपेरी पडद्यावरील जॅकी अर्थात जग्गूदादाची ही सामाजिक बाजू लोकांना पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळणार आहे. 'ट्री आर्मी' या चळवळीने आता गती घेतली आहे. ट्री आर्मीच्या माध्यमातून वृक्षारोपन ही आता चळवळ बनत आहे. जॅकी श्रॉफ यांच्याशी संवाद साधण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने आपले योगदान देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ट्री आर्मीच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार बाबर यांनी केले आहे.
पुढे बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले, विधानसभा निवडणूकीनंतर आपण जेवढे मताधिक्य जनतेने आपल्याला दिले आहे, तेवढी झाडे लावण्याचा संकल्प केला होता. ट्री आर्मीच्या माध्यमातून हा संकल्प पूर्ण करण्याचा आपला मानस आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच रणजित पाटील यांच्या पुढाकारातून साळशिंगे रस्त्याला झाडे लावली आहेत. त्याची जोपासणा चांगली होत आहे.
या निमीत्ताने जॅकी श्रॉफ अर्थात जग्गू दादा यांच्याशी संवाद साधता येणार आहे. जग्गू दादाची सामाजिक बाजू लोकांना पहायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळणार आहे. शिवाय या ठिकाणीही मियावाकी पद्धतीचे जंगल उभारण्यात येणार आहे, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने आपले योगदान देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी ट्री आर्मीच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार बाबर यांनी केले आहे. यावेळी माजी नगरसेवक अमर शितोळे, नविन यात्रा कमीटीचे अध्यक्ष रणजित पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, नगरसेवक भालचंद्र कांबळे, अॅड. रोहित पवार, श्रीधर जाधव, सरपंच संग्राम नलवडे, सौरभ रोकडे, दिलिप किर्दत, सुजय गोसावी, कर्तव्य फौंडेशन आणि ट्री आर्मीचे सैनिक उपस्थित होते.