ईश्वरपूर दि. 31 -मुंबई पोलीस दलामध्ये 39 वर्षांची प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवा बजावल्यानंतर संजय जगन्नाथ टिबे हे आज दि. 31 ऑक्टोबर 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. संजय टिबे हे दि. 1 ऑक्टोबर 1987 रोजी मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. भरती झाल्यापासून त्यांनी मुंबई पोलीस दलात अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक गुन्ह्यांचा अत्यंत कौशल्याने तपास करून आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नेहमीच त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.
पोलीस सेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला आहे. त्यांचे वडील आणि चुलते देखील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झाले होते . त्याच आदर्शाचा वारसा पुढे नेत संजय टिबे यांनीही पोलीस दलाची मान उंचावली. सेवानिवृत्ती निमित्त त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त होत आहेत