इंदापूरात गुटखा माफियांवर धाड; ₹2.41 लाखांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; एकावर गुन्हा दाखल.

👤 अतुल सोनकांबळे इंदापूर | 📅 20 June 2026 | 👁 230 Views
इंदापूरात गुटखा माफियांवर धाड;  ₹2.41 लाखांचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त; एकावर गुन्हा दाखल.
अन्नसुरक्षा विभाग -पोलिसांची संयुक्त कारवाई; गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात मोठा प्रहार"
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध व्यापाराविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि इंदापूर पोलिसांनी संयुक्तरीत्या मोठी कारवाई करत इंदापूर शहरात तब्बल ₹2 लाख 41 हजार प्रतिबंधित साठा जप्त केला आहे. या प्रकरणी इम्रान हुसेन शेख यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवार (दि. 19 जून) रोजी पहाटे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी इंदापूर नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात छापा टाकला. प्राथमिक तपासणीदरम्यान इम्रान हुसेन शेख यांच्या ताब्यातील ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खुळे चौक परिसरातील एबीएस शॉपिंग कॉर्नरमधील गाळा क्रमांक 6 वर धाड टाकण्यात आली.

या कारवाईत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. पंचनामा करून संपूर्ण माल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालामध्ये विविध कंपन्यांच्या पानमसाला आणि सुगंधित तंबाखू उत्पादनांचा समावेश असून त्याची एकूण बाजारमूल्य किंमत ₹2.41 लाखांपेक्षा अधिक असल्याचे अधिकृत नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

तपासादरम्यान प्रतिबंधित मालाच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील वैध कागदपत्रे उपलब्ध करून देता आली नसल्याने संबंधित प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे. सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराची दखल घेत इंदापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.

राज्य शासनाने गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातलेली असतानाही अशा पदार्थांचा अवैध व्यापार सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अशा पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगासह अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.

ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे, विजय सोनवणे, संतोष सावंत, अक्षय शेळके, समृद्धी चव्हाण तसेच इंदापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने पार पाडली. सहाय्यक आयुक्त विश्वजीत शिंदे, सहआयुक्त दिगंबर भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, प्रतिबंधित गुटखा, पानमसाला किंवा सुगंधी तंबाखूचा साठा, विक्री अथवा वाहतूक होत असल्याची माहिती नागरिकांनी प्रशासनाला देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

ठळक बाबी

▪️ इंदापूरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांवर मोठी कारवाई
▪️ इम्रान हुसेन शेख यांच्या ताब्यातून ₹2.41 लाखांचा साठा जप्त
▪️ अन्न व औषध प्रशासन व पोलिसांचे संयुक्त ऑपरेशन
▪️ BNS आणि अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
▪️ अवैध पुरवठा साखळीच्या तपासाला वेग
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल |