सोलापूर जिल्ह्यात 163 (1) कलम अन्वये डॉल्बी व लेझर लाईट वापरास बंदी

👤 अतुल फसाले | 📅 23 June 2026 | 👁 164 Views
सोलापूर जिल्ह्यात 163 (1) कलम अन्वये डॉल्बी व लेझर लाईट वापरास बंदी

सोलापूर, दि. २२ : मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम व मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीम तसेच लेझर लाईटच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हादंडाधिकारी कार्तिकेयन एस. (भा.प्र.से.) यांनी सोलापूर जिल्ह्यात अशा साधनांच्या वापरास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अन्वये हा आदेश लागू करण्यात आला असून, दि. १६ जून २०२६ ते २६ जून २०२६ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांकडून आयोजित कार्यक्रम व मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईट शो/वापरास बंदी राहणार आहे.
मोठ्या आवाजातील डॉल्बी सिस्टीममुळे काही नागरिकांना कान व छातीचे गंभीर त्रास होण्याची शक्यता असून, लेझर लाईटमुळे विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊ शकते. याबाबत विविध सामाजिक संघटना व नागरिकांकडून प्रशासनाकडे निवेदने प्राप्त झाली होती.

सार्वजनिक सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, दिनांक 16 जून 2016 ते 26 जून 2026 या कालावधीत सोलापूर जिल्ह्यामध्ये सार्वजनिक उत्सव मंडळाकडून आयोजित कार्यक्रम मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीम लेझर लाईट शो चा वापर करणे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार प्रतिबंध करण्यात येत आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येईल.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |