शालेय विद्यार्थी वाहतुक करण्याऱ्या 11 दोषी वाहनांवर कारवाई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे

👤 राहुल टिबे सांगली | 📅 23 June 2026 | 👁 196 Views
शालेय विद्यार्थी वाहतुक करण्याऱ्या 11 दोषी वाहनांवर कारवाई  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे
: सांगली शहर आणि जिल्ह्यात शाळकरी मुलांची अवैध व धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध तसेच अवैधरित्या शालेय विद्यार्थी वाहतुक वाहतुकीस आळा घालण्यासाठी विशेष तपासणी मोहिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दि. 23 जून 2026 रोजी राबविण्यात आली. या मोहिमेच्या अनुषंगाने सांगली शहर कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यावर अवैध शालेय विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या एकूण 11 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, अपुऱ्या कागदपंत्रासह नियमबाह्य अवैध शालेय विद्यार्थी वाहतुक करताना अधिक विद्यार्थी घेणे, सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारे बेकायदेशीर शालेय विद्यार्थी वाहतुक करण्याऱ्या वाहनाच्या विरोधामध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालच्यावतीने यापुढे ही तीव्र स्वरुपात कारवाई करण्यात येणार आहे. मुलांचा शाळाप्रवास सुरक्षित ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नव्हे, तर पालक आणि शाळांचीही संयुक्त जबाबदारी आहे. किरकोळ आर्थिक फायद्यासाठी किंवा सोयीसाठी मुलांच्या जिवाशी खेळ करू नये. वाहन अधिकृत आहे का तपासावे. आपल्या पाल्याला ज्या वाहनातून (बस, वॅन ) शाळेत पाठवता, त्या वाहनाला आरटीओचा 'स्कूल बस' (School Bus) म्हणून अधिकृत परवाना (Permit) आहे का, याची खात्री करावी. प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 'शालेय परिवहन समिती' अंतर्गत विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुकीबद्दल वेळोवेळी दरमहा बैठक घेऊन वाहतूक व्यवस्थेचा आढावा घ्यावा. प्रत्येक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीने अवैधरित्या विद्यार्थी वाहतूक करण्याऱ्या वाहनांना आवारात बंदी करावी.
ज्या खाजगी वॅन, रिक्षा किंवा बस चालकांकडे शाळा वाहतुकीचा अधिकृत परवाना नाही, त्यांना शाळेच्या आवारात किंवा गेटजवळ विद्यार्थी सोडण्यास व नेण्यास मज्जाव करावा. प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांनी पालक-शिक्षक संघात (PTA) चर्चा करून पालकांच्या सभेत शाळा वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर ठेवून पालकांचे प्रबोधन करावे. शाळेच्या बस किंवा वॅनमध्ये विद्यार्थिनी प्रवास करत असतील, तर नियमानुसार महिला अटेंडंट (महिला मदतनीस) असणे अनिवार्य करावे. एक दक्ष पाऊल अपघाताला दूर ठेवू शकते, असे आवाहन सांगली शहर आणि सांगली जिल्ह्यातील पालकांना आणि मुख्याध्यापकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |