दुःखाच्या काळात तिगाव गावाची माणुसकी; सानप कुटुंबाला ₹1 लाख 83 हजारांची मदतीचा हात

👤 संकेत तुकाराम सानप ( संपादक मुंबई) | 📅 17 June 2026 | 👁 367 Views
दुःखाच्या काळात तिगाव गावाची माणुसकी; सानप कुटुंबाला ₹1 लाख 83 हजारांची मदतीचा हात
दुःखाच्या काळात तिगाव गावाची माणुसकी; सानप कुटुंबाला ₹1 लाख 83 हजारांची मदतीचा हात*
महेश व ओमकार सानप यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण गाव एकवटले
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तिगाव गावातील सानप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना संपूर्ण गाव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले.
तिगाव येथील कै. चि. महेश गोरखनाथ सानप (वय १८) व कै. चि. ओमकार गोरखनाथ सानप (वय १४) या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत असताना सामाजिक बांधिलकी जपत ग्रामस्थांनी सानप कुटुंबाला आधार देण्यासाठी पुढाकार घेतला.
"एकच ध्यास तिगावचा विकास" या सामाजिक समूहाच्या माध्यमातून ग्रामस्थ, युवक व विविध स्तरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मदत निधी संकलित केला. या उपक्रमातून तब्बल ₹1 लाख 83 हजार इतकी रक्कम जमा करण्यात आली.
संकलित मदतीचा धनादेश आज तिगावचे सरपंच ज्ञानेश्वर किसन सानप यांच्या हस्ते तसेच गावातील मान्यवर, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुलांच्या मातोश्री मनिषा गोरक्ष सानप यांना सुपूर्त करण्यात आला.
यावेळी सानप कुटुंबीय, ग्रामस्थ, युवक वर्ग तसेच गावातील विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी दिवंगत महेश व ओमकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांना धीर दिला.
तिगाव ग्रामस्थांनी दाखविलेली एकजूट, सामाजिक संवेदनशीलता आणि माणुसकीचा हा आदर्श उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत असून, संकटाच्या काळात गाव एक कुटुंब म्हणून उभे राहते याची प्रचिती पुन्हा एकदा आली. यावेळी मंत्रालय मिडिया पत्रकार संकेत तुकाराम सानप यांनी संपूर्ण सानप कुटुंबाच्या वतीने गावकरी व मदत करणारे सर्वांचे आभार मानले
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |