तुमच्या नावावर किती सिम कार्ड? तपासले नाही तर अडचणीत येण्याची शक्यता

👤 अतुल फसाले | 📅 20 May 2026 | 👁 232 Views
तुमच्या नावावर किती सिम कार्ड? तपासले नाही तर अडचणीत येण्याची शक्यता
आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत? याबाबत केंद्र सरकारच्या "संचार सारथी" पोर्टल खात्री करून घ्यावी. बहुतांशी सायबर गुन्ह्यांच्या तपासामध्ये आर्थिक आमिषाला बळी पडून सिम कार्ड दुसऱ्या व्यक्तीस वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी नागरिकांनी अशा आमिषाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. अरविंद माने, पोलिस निरीक्षक, सोलापूर

सोलापूर : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेऊन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत, याची माहिती प्रत्येक नागरिकाने तपासणे आवश्यक झाले आहे. अन्यथा गुन्हेगारांकडून होणाऱ्या गैरवापरामुळे निष्पाप नागरिकांनाही चौकशीला सामोरे जावे लागू शकते.
सायबर गुन्हेगार बनावट किंवा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड सक्रिय करून आर्थिक फसवणूक, ओटीपी चोरी, सोशल मीडियावर बदनामी, धमकीचे कॉल तसेच बँक खात्यांमधून पैसे काढण्याचे प्रकार करत आहेत. पोलिस तपासात अशा सिम कार्डचा मागोवा घेतला जातो आणि संबंधित नावाच्या व्यक्तीपर्यंत तपास पोहोचतो. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी आपल्या नावावरील मोबाईल कनेक्शन तपासणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने “संचार साथी” पोर्टल सुरू केले असून या माध्यमातून नागरिकांना आपल्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत, याची माहिती मिळू शकते. संशयास्पद किंवा अनोळखी नंबर दिसल्यास तो बंद करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
तज्ज्ञांच्या मते, हॉटेल बुकिंग, सिम खरेदी किंवा इतर कामांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखी कागदपत्रे देताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. कागदपत्रांच्या प्रतींवर तारीख आणि कारण नमूद करावे. अनोळखी व्यक्तींना ओळखपत्र देणे टाळावे. मोबाईल हरवल्यास तातडीने पोलिसांत तक्रार करून संबंधित सिम ब्लॉक करावे.
दुसऱ्याच्या नावावरील सिम कार्ड वापरणे हा गंभीर गुन्हा असून नवीन दूरसंचार कायद्यानुसार अशा प्रकारांमध्ये तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |