आटपाडी तालुक्याचा दुष्काळी कलंक मिटणार का ?

👤 आटपाडी प्रतिनिधी | 📅 07 May 2026 | 👁 155 Views
आटपाडी तालुक्याचा दुष्काळी कलंक  मिटणार का ?
बंद पाईपलाईनचे काम होणार कधी ? मेंढपाळांचे स्थलांतर थांबणार कधी?




आटपाडी तालुक्याचा दुष्काळाचा कलंक औंदाच्या सालात मिटणार का ? मेन फळांचे स्थलांतर थांबणार का ? तरुणांना रोजगार मिळणार का ? टेंभूचे पाणी येणार का ? अशा अनेक प्रश्न दुष्काळी भागातील तरुणांच्या व शेतकरी यांच्या मनामध्ये असे विचार घर करून राहिले आहेत.
सततचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा या भागातील साऱ्यासाठी आणि पाण्यासाठी गुरे ढोरे घेऊन आजही चाऱ्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे .
निवडणुकीत टेंभू पाण्याचे गाजर.....
जवळपास तीन ते चार विधानसभा झाल्या जिल्हा परिषदा झाल्या पंचायत समिती निवडणुका झाल्या परंतु या सर्व निवडणुकीमध्ये मतदारांना गाजर दाखवले ते फक्त आणि फक्त टीम योजनेचे याच टेंभू योजनेच्या नावाखाली नेत्यांनी मते घेतली निवडून आले परंतु पुन्हा टेंभू योजनेचे काम पूर्ण करण्याकडे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे.
अनेक ठिकाणी बंद पाइपला येऊन पडले आहेत काही ठिकाणी चारी पाडले आहेत. परंतु अनेक दिवसापासून किंवा वर्षानुवर्षे हे काम बंद अवस्थेतच आहे विधानसभा आली लोकसभा आली की तेवढ्यापुरते काम सुरू झालेली दिसते आणि निवडणूक झाली की काम बंद अवस्थेत दिसून येत आहे.
सततचा दुष्काळ असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांनी स्थलांतर केले आहे .मुंबई पुणे येथे मिळेल ते काम करून स्वतःची उपजीविका भागवत आहे .जर शेतीला पाणी आले तर तरुणांना स्थलांतर करण्याची काही गरज नाही .इथेच रोजगार उपलब्ध होऊ शकतो .स्वतःच्या शेतीतूनच तो भरमसाठ प्रमाणामध्ये उत्पन्न घेऊ शकतो व त्याची व त्याच्या कुटुंबाची उपजीविका भागू शकते .मुलांचे शिक्षण त्यांना लागणारा खर्च आरोग्यावर होणारा खर्च हा तो स्वतः करू शकतो .परंतु हे कधी शक्य आहे तर पाणी शिवारात फिरले तर हे शक्य आहे अन्यथा आजही तरुण उपजीविकेसाठी स्थलांतर करतो आहे . उद्याही स्थलांतरच करणार आहे या स्थलांतरामुळे त्या तरुणांच्या मुलाबाळाच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे
सध्या वंचित गावांना पाणी देण्यासाठी बंद पाईपलाईनचे काम सुरू आहे परंतु यंदा शिवारात पाणी बघायला मिळणार का हाही गंभीर प्रश्न आहे.
जर यावर्षी शिवारामध्ये टेंभूचे पाणी पाहायला मिळाले तर पुढील वर्षी काही प्रमाणात चाऱ्यासाठी व पाण्यासाठी स्थलांतर थांबेल अशी अपेक्षा नागरिकांतून केली जात आहे. आयुष्याला दुष्काळाचा लागलेला कलंक संपुष्टात येईल परंतु त्या गतीने बंद पाईपलाईनचे काम होऊन एक दोन महिन्यात तरी पाणी शिवारामध्ये बघायला मिळावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे

सध्या उन्हाच्या झळा बसू लागले आहेत त्यामुळे शिवारातील चारा सुकला आहे अनेक मेंढपाळांनी चाऱ्यासाठी स्थलांतर केले आहे तर अनेक विहिरींनी तळ गाठल्याने पिके पण सुकू लागली आहेत अशा या अवस्थेमध्ये जर लवकरात लवकर टेंभूचे पाणी शिवारात आले तर कायमचा दुष्काळ मिटेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे
अनेक कुटुंबाचे जीवन हे फक्त आणि फक्त शेतीवरच अवलंबून आहे शेतीमध्ये उत्पादन घ्यायचे आणि मुलांचे शिक्षण करायचे दवाखान्याचा खर्च भागवायचा रोजच्या उपजीविकेसाठी लागणारा खर्च त्यातूनच करायचा त्यामुळे येणाऱ्या पैशातून खर्च भागत नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे जर शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळाले तर त्या शेतीतून उत्पन्न निघून निदान मुलांच्या शिक्षणाचा व उपजीविकेचा तरी खर्च निघेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गांना आहे
अनेक वर्षापासून प्रत्येक निवडणुकीमध्ये टेंभू योजनेच्या नावाचा उपयोग करून मताची झोळी भरून घेतली जात असते परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये टेंभू योजनेच्या बंद पाईपलाईनचे काम सुरू आहे परंतु प्रत्यक्षात शिवारात पाणी कधी येणार या कडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत

जनावरांचे चाऱ्याचा प्रश्न मिटवायचा की स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करायचे . स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर निर्माण होत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अनेक मेंढपाळांची मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत. काही शेतकऱ्यांची मुलं थोडे फार शिक्षण घेऊन मुंबई पुणे या ठिकाणी मिळेल तो कामधंदा करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढील पिढीवर सुद्धा शिक्षणाचा परिणाम होत आहे.
आटपाडी तालुक्याला टेंभू योजना ही वरदान ठरली आहे. परंतु या योजनेचे पाणी संपूर्ण शिवारात पोहोचले नाही. अनेक भागांमध्ये टेंभूचे पाणी बघायला सुद्धा मिळाले नाही. ठराविक मुख्य ठिकाणी टेंभूचे पाणी आले आहे. तालुक्यातील अनेक गावे टेंभू योजनेपासून वंचित आहेत, तर काही गावांमध्ये पाणी आले आहे. परंतु ते ओढ्यांनी तलावामध्ये आलेले आहे. या तलाव्यापासून कितीतरी लांब शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, त्या जमिनीला पाणी न्ह्यायचे कसे ? हा गंभीर प्रश्न आहे.
टेंभू योजनाचे पाणी येणार आणि तालुका सुजलाम सुफलाम होणार या स्वप्नात शेतकरी गेली कित्येक वर्ष जगत आला आहे. तालुक्याचा उत्तर व पश्चिम भाग अजूनही पाण्यापासून वंचित आहे .तालुक्यातील या वंचित गावांना पाणी येणार कधी ?आणि जरी वंचित गावांना पाणी आले तरी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाणार कधी ? हा एक गंभीर प्रश्न आहे.
सततचा दुष्काळ टेंभू योजनेचे चाललेले मंद गतीने काम, यामुळे शेतकरी वर्ग वैतागून गेला आहे. शेतीतून उत्पन्न निघत नाही, तर मग मुलांच्या शिक्षणाला पैसे आणायचे कुठून हा ही गंभीर प्रश्न आहे. त्यामध्ये स्वतः जगायचं की जनावरे जगवायची, की मुलांच्या शिक्षणाला पैसे खर्च करायचे, की मुलांच्या आरोग्याला पैसे खर्च करायचे हाही गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे.
सततचा दुष्काळ असल्याने अनेक तरुणांचे शिक्षण निम्म्यावरती झाले आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. अशा मुलांना नोकऱ्या सुद्धा मिळेनात अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पुढची पिढी शिक्षण घेणार की नाही ? हाही गंभीर प्रश्न आहे

शेतकरी हा बँकेच्या थकबाकीच्या यादीत गेला आहे. तर शेतकऱ्यांची पत बँकेतून संपली आहे. शेतीतून उत्पन्न नसल्याने पूर्वीचे कर्ज न भरल्यामुळे पुन्हा बँक कर्ज देत नाहीत. त्यामुळे मुला मुलींची लग्न, स्वतः जगणे ,जनावरं जगवणे, दवाखान्याचा खर्च या सगळ्या गोष्टीला शेतकरी वैतागून गेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सहा महिने आठ महिने गुरेढोरे घेऊन जगण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे.
थोडं फार शिक्षण घेऊन अनेक तरुण मुंबई पुणे येथे मिळेल ते काम धंदा करून जगत आहेत .मिळणाऱ्या पगारांमध्ये स्वतःचच पोट भागत नाही. त्यामुळे भावंडांना बहिणींना शिक्षणासाठी पैसे देणार तरी कुठून ? हा ही गंभीर प्रश्न आहे .स्वतः जगायचं की कुटुंबाला जगवायचं हा ही तरुणांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे.
जर टेंभू योजनेचे पाणी गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले तर आणि तरच शेतकरी शेतीतून उत्पन्न घेऊ शकेल. जनावरे जगू शकतील आणि त्यातून येणाऱ्या पैशातून मुलांचे शिक्षण करू शकेल, अन्यथा शेतकरी हा नावापुरताच....
असं म्हणले जाते शेतकरी राजा आहे. तर मग तो खरोखर कधी राजा होणार हाय का स्वप्नच राहणार आहे.
संपूर्ण तालुका ओलिताखाली आणण्यासाठी अनेक संघटनांचे आंदोलने चालू आहेत. परंतु टेंभू योजनेचे अगदी संत गतीने काम सुरू आहे. त्यामुळे या चार वर्षात तरी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येईल का नाही यामध्ये शंका आहे.

अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये टेंभूच्या नावाचा जागर करण्यात आला. काम थोडे थोडे होत आहे .पण ते कधी पूर्ण होणार हा गंभीर प्रश्न आहे. विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, लोकसभा असो अशा अनेक निवडणुका टेंभूच्या नावाने निवडणुकीचा प्रचार होत आहे. परंतु प्रत्यक्षात योजना पूर्ण झाली नाही. परंतु अनेक संघटना अनेक राजकीय नेते टेंभू योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहेत .परंतु या प्रयत्नाला थोडे थोडे यश येत आहे. योजना पूर्ण झाली तर मेंढपाळांचे स्थलांतर थांबेल तरी योजना लवकरात लवकर पूर्ण करून शिवारात पाणी बघायला मिळावे अशी मागणी शेतकरी व मेंढपाळ बांधवाकडून होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |