इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

👤 वैभववाडी प्रतिनिधी - तुषार शिंगाडे | 📅 07 May 2026 | 👁 176 Views
इंधन तुटवड्याच्या अफवांना बळी पडू नका; प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
जिल्ह्यात उन्हाळी पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काही काळ इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची स्थिती होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत.
जिल्हा प्रशासनाने भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOCL) या कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपधारकांशी सातत्याने संपर्क साधून पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे इंधनाची उपलब्धता स्थिर करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यात इंधन टंचाईबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अफवांमुळे अनावश्यक भीती निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर गर्दी वाढत असून, त्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि इंधन खरेदीसाठी अनावश्यक गर्दी टाळावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |