तुमच्या नावावर किती सिम कार्ड? तपासले नाही तर अडचणीत येण्याची शक्यता

👤 अतुल फसाले सोलापुर | 📅 12 May 2026 | 👁 87 Views
तुमच्या नावावर किती सिम कार्ड? तपासले नाही तर अडचणीत येण्याची शक्यता
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसऱ्याच्या नावावर सिम कार्ड घेऊन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत, याची माहिती प्रत्येक नागरिकाने तपासणे आवश्यक झाले आहे. अन्यथा गुन्हेगारांकडून होणाऱ्या गैरवापरामुळे निष्पाप नागरिकांनाही चौकशीला सामोरे जावे लागू शकते.
सायबर गुन्हेगार बनावट किंवा चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड सक्रिय करून आर्थिक फसवणूक, ओटीपी चोरी, सोशल मीडियावर बदनामी, धमकीचे कॉल तसेच बँक खात्यांमधून पैसे काढण्याचे प्रकार करत आहेत. पोलिस तपासात अशा सिम कार्डचा मागोवा घेतला जातो आणि संबंधित नावाच्या व्यक्तीपर्यंत तपास पोहोचतो. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी आपल्या नावावरील मोबाईल कनेक्शन तपासणे गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने “संचार साथी” पोर्टल सुरू केले असून या माध्यमातून नागरिकांना आपल्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत, याची माहिती मिळू शकते. संशयास्पद किंवा अनोळखी नंबर दिसल्यास तो बंद करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
तज्ज्ञांच्या मते, हॉटेल बुकिंग, सिम खरेदी किंवा इतर कामांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखी कागदपत्रे देताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. कागदपत्रांच्या प्रतींवर तारीख आणि कारण नमूद करावे. अनोळखी व्यक्तींना ओळखपत्र देणे टाळावे. मोबाईल हरवल्यास तातडीने पोलिसांत तक्रार करून संबंधित सिम ब्लॉक करावे.
दुसऱ्याच्या नावावरील सिम कार्ड वापरणे हा गंभीर गुन्हा असून नवीन दूरसंचार कायद्यानुसार अशा प्रकारांमध्ये तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |