प्रेमिकेसोबत लॉजवर लपला, पण एलसीबीच्या जाळ्यात अडकला!

👤 राहुल टिबे सांगली | 📅 15 June 2026 | 👁 186 Views
प्रेमिकेसोबत लॉजवर लपला, पण एलसीबीच्या जाळ्यात अडकला!
हमाल नेत्याच्या नातवाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार नीलेश गडदे गजाआड
सांगली : मिरज तालुक्यातील रेल्वे मालधक्का कामाच्या मक्तेदारी आणि खंडणीच्या वादातून घडलेल्या थरारक हत्याकांडातील मुख्य सूत्रधार नीलेश विठोबा गडदे (वय ३२) याला सांगली पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. घरात घुसून हमाल नेत्याच्या निष्पाप नातवाचा बळी घेणाऱ्या या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) शाखेने कर्नाटक सीमेलगतच्या एका लॉजवर मैत्रिणीसोबत रंगेहात पकडले.
हत्येनंतर पोलिसांना गुंगारा देत कर्नाटकात पलायन केलेल्या गडदेने गुप्त लॉजमध्ये आश्रय घेतला होता. मात्र तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे एलसीबीने त्याचा ठावठिकाणा शोधून काढला. नियोजनबद्ध सापळा रचत पोलिसांनी लॉजवर धाड टाकली आणि गडदेसह त्याच्या मैत्रिणीलाही ताब्यात घेतले.
या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली असून, गुन्ह्यातील अन्य तीन फरार साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
झापाचीवाडी हद्दीतील ओढ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे; टेंडरबाह्य साहित्य वापरल्याचा आरोप , मृदा व जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष | पोलीस आयुक्त एम. राजकुमार साहेब यांनी केले अंबिका नगर च्या विध्यार्थ्यांचे स्वागत | शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी व शिक्षण विभागाचा जिल्हाभर जल्लोषमय दौरा; विद्यार्थ्यांच्या स्वागताने दुमदुमल्या जिल्हा परिषद शाळा | डाळिंबाच्या ‘कॅलिफोर्निया’ची यशोगाथा आता इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकात; राज्यभर गाजले अजनाळे | आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत | आषाढी यात्रा कालावधित कलम 163 चे घोषणापत्र जारी | माळशिरस वाहन अपघात-जिल्हाधिकाऱ्यांकडून 'चौकशी समिती' गठीत, | "वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ" | आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका | चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मधुरा बाईतचे यश |