स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन - सुशांत नाईक यांचा इशारा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 June 2026 | 👁 117 Views
स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन - सुशांत नाईक यांचा इशारा
वीज ग्राहकांची परवानगी न घेता अदानी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत उद्धवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार तातडीने थांबवावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडून महावितरण कार्यालयावर मोर्चसेनेचे जि 93ल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला.

सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज, मंगळवारी महावितरणचे सचिन राऊत यांची भेट घेत स्मार्ट मीटरबाबत जाब विचारला. यावेळी प्रभारी उपकार्यकारी अभियंता एम. एम. सावंत, शाखा अभियंता ओमकार स्वामी यांच्यासह नगरसेवक जयेश धुमाळे, संकेत नाईक, दिव्या साळगावकर, राजू राठोड, महेश कोदे आदी उपस्थित होते.

यावेळी शिष्टमंडळाने अदानी कंपनीचे कर्मचारी ग्राहकांची एनओसी न घेता थेट स्मार्ट मीटर बसवत असल्याचा आरोप केला. तसेच त्याबाबतचा मेसेज ग्राहकांना मोबाईलवर पाठविण्यात आला असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्राहकांची परवानगी नसल्यास स्मार्ट मीटर बसवू नयेत, असे आवाहन केले आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहकांना ४८ तासांच्या आत स्मार्ट मीटर बसविण्याचे संदेश पाठविले जात असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय अदानी कंपनीचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसवू शकत नाहीत, असा आरोप करत त्यांनी महावितरणची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. तसेच स्मार्ट मीटर सक्तीबाबत शासनाचा कोणता आदेश अथवा राजपत्र आहे का? अदानी कंपनीवर महावितरणचे नियंत्रण आहे का? असे प्रश्न उद्धवसेना पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले. यावेळी महावितरणकडून शासनाकडून प्राप्त राजपत्राची माहिती शिष्टमंडळाला देण्यात आली. मात्र, ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू राहिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्धवसेनेने दिला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
"वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ" | आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका | चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मधुरा बाईतचे यश | जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे ठरले देवदूत | पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्ग दुतर्फा करणार वृक्ष लागवड | नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा | शिव व्यापार व रोजगार सेनेच्या कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी शंकर पार्सेकर यांची नियुक्ती | स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन - सुशांत नाईक यांचा इशारा | शिडवणे येथील जिल्हा परिषद शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव व पूर्वतयारी मेळावा संपन्न | नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित |