कणकवली पंचायत समितीत खासदार विनोद तावडे व आमदार प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर

👤 वैभववाडी प्रतिनिधी - तुषार शिंगाडे | 📅 07 May 2026 | 👁 210 Views
कणकवली पंचायत समितीत खासदार विनोद तावडे व आमदार प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर
राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झालेले विनोद तावडे आणि विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झालेले प्रमोद जठार यांच्या अभिनंदनाचा ठराव कणकवली पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. पंचायत समिती सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत आणि प्रदीप गावडे यांनी हा अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी बोलताना बबलू सावंत व प्रदीप गावडे यांनी सांगितले की, विनोद तावडे आणि प्रमोद जठार हे दोन्ही नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, या दोन्ही नेत्यांच्या निवडीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. पंचायत समितीच्या या मासिक बैठकीत मांडण्यात आलेल्या या ठरावाला संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात अनुमोदन दिले. सिंधुदुर्गच्या या दोन सुपुत्रांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल यावेळी सदस्यांनी आनंद व्यक्त केला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |