पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्ग दुतर्फा करणार वृक्ष लागवड

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 18 June 2026 | 👁 202 Views
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्ग दुतर्फा करणार वृक्ष लागवड
सरपंच संदीप सावंत आणि वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजन
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच संदीप सावंत आणि वागदे ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ जून रोजी स.१० वा. वागदे येथे मुंबई - गोवा महामार्गाच्या दुतर्फा सुमारे ६ किमी. परिसरात (गडनदी पुल ते डंगळवाडी) सावली देणाऱ्या झाडांची लागवड केली जाणार असल्याची माहिती वागदे सरपंच संदीप सावंत यांनी दिली. ते म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणावेळी झाडे तोडण्यात आली, त्यामुळे महामार्गावर सावलीसाठी एकही झाड नाही. म्हणूनच आम्ही महामार्गावर दुतर्फा सावली देणारी झाडे लावणार आहोत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व व पुढील पिढ्यांना हिरवागार परिसर दिसावा यासाठी प्रत्येकाने 'एक तरी झाड लावावे' असा संदेश यातून आम्ही देणार आहोत. २३ जून रोजी स. १० वा. गडनदी पुलापासून या वृक्षारोपणास प्रारंभ होणार आहे. या उपक्रमात सर्व ग्रामस्थांनी, पर्यावरण प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन संदीप सावंत यांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी विजयी; सुधाकर कोहळे यांचा पराभव! | *'सुरक्षित बालपण' व्याख्यानमालेने जागविली बालकांची सजगता: सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात तीन दिवसीय शिबिराची दिमाखात सांगता!* | कवठे एकंद–नागाव परिसरात केबल-मोटार चोरांचा धुमाकूळ; तासगाव पोलिसांचा तपास कुठे अडकला | बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ | अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता, अपहृत मुली, महिला व पुरुषांचा लावला यशस्वी शोध | रामटेक तालुक्यात नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी १,६४७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क | *भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* |