महाराष्ट्र शासन रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबईची सर्वसाधारण सभा श्री देव कुणकेश्वर भक्त निवास येथे अध्यक्ष विजय गोखले आणि सचिव दिलीप वाघमारे तर सिंधुदुर्ग चे सुपुत्र सदस्य विजय चव्हाण व रत्नागिरीचे सदस्य राजेश गोसावी व पदमश्री पुरस्कार विजेते परशुराम खुणे यांचे उपस्थितीत संपन्न झाली.
सायंकाळी पत्रकारांशी औपचारिकता गप्पा मारताना अध्यक्ष आणि ज्येष्ठ सिनेनट विजय गोखले बोलत होते. Sensor बोर्ड च्या संपूर्ण इतिहासात आणि विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीत दोन वेळा सिंधुदुर्ग मध्ये मंडळाची सभा होतेय. महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यात आतापर्यंत दोन वेळा सभा झालेली नाही. विजय चव्हाण यांचा आग्रह, आपुलकीचे निमंत्रण यामुळे सिंधुदुर्ग भरभरून पाहता आला. अनुभवता आला. सिंधुदुर्ग मधील विविध लोकं कला, नाट्य, नट, संस्कृती बघायला मिळाली. इथली लोकेशन, निसर्ग, निळेशार समुद्रकिनारे, जागृत देवस्थानाची अनुभूती घेता आली. आतापर्यंत ऐकून होतो पण प्रत्यक्ष जवळून पाहता आले की खरंच येथे प्रत्येक गावात नाटक आणि प्रत्येक घरात नट जन्मास आला आहे.
प्रभू परशुरामाच्या या पावन भूमीत देवदेवतानी आणि निसर्गाने मुक्त हस्तानी उधळण केलीय. कोकणाने आपलेपण आणि नैसर्गिक ठेवा जपला पाहिजे आणि सिनेमा, मालिका यांना फुकट लोकेशन देऊ नयेत असेही विजय गोखले यांनी आवर्जून सुचविलेय.
संपूर्ण महाराष्ट्रात मराठीसह विविध भाषांमधून सादर होणाऱ्या सर्व प्रकारच्या रंगमचिय आविष्काराच्या प्रयोग पूर्व परिनिरीक्षणाचे अत्यंत महत्वाची जबाबदारी या sensor बोर्डवर असतें.
या मंडळावर महाराष्ट्रातील विविध भागातून दिग्गज, नामवंत आणि जाणकार सदस्यांची शासनामार्फत निवड केलेली असतें. महाराष्ट्रात सादर होणाऱ्या सर्व रंगमांचिय आविष्कार यामधून कोणतीही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, देशाच्या हिताच्या विरुद्ध किंवा राष्ट्रीय भावना दुखवणारे, जातीपाती, धर्मविरोधी, हिंसाचारला प्रोत्साहन देणारे, गुन्हेगारीस चालना देणारे, अपप्रवृत्तीसं पाठिंबा देणारे,महिला,मागास समाज, अन्य सामाजिक घटक यांचे खच्चीकरण करणारे, राष्ट्र आणि राष्ट्रपुरुष यांचे अवमान करणारे असे प्रकारच्या रंगमंचिय आविष्कारांना चाप बसावा, यासाठी सर्व संहिताची प्रयोग पूर्व काटेकोर परिनिरीक्षण होणे गरजेचे आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी या sensor बोर्डवर असतें. अश्या आक्षेपहार्ये संहितावर सखोल चर्चा करून निर्णय घेणे, परवानगी नाकारणे ही कामे हे मंडळ करीत असतें.
या मंडळावर सिंधुदुर्ग चे ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य लेखक आणि सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुकुंद चव्हाण हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या व रत्नागिरीचे सदस्य राजेश गोसावी यांच्या पुढाकाराने ही सभा आयोजित करनेत आली होती.
मंडळाच्या सभा कामकाजा नंतर सर्व सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, देवगड किल्ला, विमलेश्वर मंदिर, देवगड बंदर, राजकोट, श्री देव कुणकेश्वर, देवबाग, तारकर्ली, तांबळडेग इत्यादी समुद्र किनाऱ्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. रात्री रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील विविध लोकं कला,अध्यक्ष विजय गोखले यांची हास्य मैफिल,सदस्य राहुल वैद्य यांचा शिवराज्याभिषेक आविष्कार,सदस्य राजेश गोसावी यांचे नेतृत्वात रत्नागिरी लांजा कुरणे येथील 40 कलाकारांनी सादर केलेले नमन, सावंतवाडी च्या वैभव पारकर व रामदास पारकर यांचे जादूचे प्रयोग,अक्षरसिंधु कणकवलीचे प्रमोद तांबे यांचे विजय चव्हाण लिखित " झम्पय " नाटकातील नाट्यप्रवेश , देवगडचे प्रमोद जोशी यांच्या कविता, कल्पना बांदेकर यांच्या सदस्य मकरंद पाध्ये यांनी सादर केलेल्या मालवणी कविता,एकपात्री, विजय चव्हाण यांची खुमासदार मालवणी भाषा, राजेश गोसावी यांचे संगमेश्वरी गाऱ्हाने, मयूर चव्हाण यांचा विजय चव्हाण लिखित "भरकाट "मधील नाट्यछटा अश्या विविध रंगमांचिय आविष्कारांचा मनमुराद आनंद सर्व रंगकर्मिनी लुटला.
... विजय मुकुंद चव्हाण यांचे सर्वच मान्यवरांकडून मुक्तकंठाणे कौतुक...
आतापर्यंत या sensor बोर्ड ला फारसा माहिती नसलेला सिंधुदुर्ग विजय चव्हाण यांच्यामुळेच मागील तीन वर्ष्यात जवळून अनुभवता आला. त्यामुळे या जिल्हातील कला आणि संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही घेऊन चाललो आहोत. यांचा नक्कीच सिनेमा, मालिका, नाटक यामध्ये समावेश करनेत येतील. सिंधुदुर्ग मधील विशेषतः चुलीवरील आणि घरगुती विविध मालवणी जेवणाचा दोन दिवस येथेच्छ आस्वाद घेता आला. कोकणी मेवा आंबे, फणस, जांभूळ, करवंद, ओले काजुगर, मासे, आमरस, कोकम सरबत, कैरीचे पन्हे इत्यादी टिपिकल मालवणी मेजवानी जगता आली.विजय चव्हाण केवळ प्रशासनातील एक जबराट व्यक्ती नसून सांस्कृतिक चळवळीतील सिंधुदुर्ग चा बुलंद आवाज आणि रंगमांचावरचा दमदार लेखक, अभिनेता लाभलाय. असे गौरवउदगार सर्वांनी काढले. पत्रकार अयोध्या गावकर यांनीही भावलेले विजय चव्हाण यावर आपल्या भावना व्यक्त केल्यात.
या सभेला अध्यक्ष विजय गोखले, सचिव दिलीप वाघमारे, सदस्य सर्वस्वी पदमश्री परशुराम खुणे, पी डी कुलकर्णी, संजय भाकरे, अशोक हंडोरे,संजय शेवतेकर, संजय देवालाणकर पाटील, सदानंद बोरकर, मुकुंद पटवर्धन, जुगलकिशोर ओझा, विश्वनाथ निळे, गुरुनाथ वठारे, दिलीप अलोणे, रवींद्र नंदाने, शिवानी जोशी, सुजाता मराठे, मोनिका ठक्कर, मकरंद पाध्ये, राहुल वैद्य,राजेश गोसावी,स्वतः विजय चव्हाण व कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग इत्यादी उपस्थित होते