गुणवत्तेमध्ये कसलीच तडजोड नाही-प्रा. प्रबुद्धचंद्र झपके

👤 संपादक - आण्णासाहेब मेटकरी | 📅 30 April 2026 | 👁 43 Views
गुणवत्तेमध्ये कसलीच तडजोड नाही-प्रा. प्रबुद्धचंद्र झपके
एम एम एस परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यामध्ये विद्यामंदिर परिवारातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करत पुन्हा एकदा उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. माझी संस्था व माझे शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात.त्यामुळे गुणवत्तेत कसल्याही प्रकारची तळजोड नसते असे प्रतिपादन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.

नाझरा विद्यामंदिर प्रशालेत आयोजित केलेल्या एन एम एम एस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नाझरा विद्यामंदिर चे मुख्याध्यापक बिभिषण माने, सांगोला विद्यामंदिर चे मुख्याध्यापक अमोल गायकवाड, माजी मुख्याध्यापक संजीव नाकील, उपमुख्याध्यापक सय्यद सर, सांगली जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक सपकाळ साहेब, पर्यवेक्षक विनायक पाटील आदी उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थी व पालक यांच्या हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून नाझरा विद्यामंदिर मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्राचार्य बिभीषण माने यांनी केला. यावेळी कार्तिक संभाजी शितोळे, ओम गोपाळ कृष्ण दीक्षित, सुजाता समाधान बाबर, प्रथमेश संतोष बाबर, सई आनंदा मिसाळ, साक्षी भगवान सरगर, सोहम प्रकाश गिड्डे, आयुष नारायण कांबळे, श्रद्धा संभाजी निंबाळकर, प्रथमेश नवनाथ केंगार, सुयश सुभाष खांडेकर या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून पालकांसमवेत सन्मानित करण्यात आले.
पुढे बोलताना प्रा. प्रबुद्धचंद्र झपके म्हणाले की,सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात नाझरा विद्यामंदिर अव्वल आहे. ग्रामीण भागातील या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी विविध प्रकारच्या संकल्पना सातत्याने राबवल्या जातात.
यावेळी मार्गदर्शक शिक्षक व विभाग प्रमुख गुरुदेव उजनीकर, सोमनाथ सपाटे,मंजुश्री ओतारी, शुभांगी नागरसे व बाह्य परीक्षा विभाग प्रमुख महालिंग पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर आभार दिलीप सरगर यांनी मांडले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा | सर्व दिंडी सोहळे पंढरपूर नगरीमध्ये दाखल" |