पावसाळी अधिवेशन 2026 दिवस दुसरा प्रश्न उत्तर विधानभवन

👤 संकेत तुकाराम सानप.मुंबई विधानभवन. | 📅 23 June 2026 | 👁 189 Views
पावसाळी अधिवेशन 2026 दिवस दुसरा प्रश्न उत्तर विधानभवन
विधानपरिषदप्रश्नोत्तरे
शिवभोजन केंद्रांना व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शासन सकारात्मक असून, काही कारणांमुळे बंद पडलेली शिवभोजन केंद्रे लवकरच पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी व्यावसायिक गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, अशा परिस्थितीतही संबंधित केंद्रांनी पर्यायी व्यवस्था करून लाभार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिले असून राज्यातील ४२ पैकी ४१ शिवभोजन केंद्रे नियमितपणे कार्यरत असल्याची माहितीही मंत्री भुजबळ यांनी दिली.

#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
छत्रपती संभाजीनगर येथील स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून महानगरपालिकेला १० कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
मुंबईतील ऐतिहासिक केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
रुग्णालयाच्या नामांतरासंदर्भात विविध स्तरांवरून मते आणि निवेदने प्राप्त झाली आहेत. काहींनी नामांतराची मागणी केली आहे, तर काहींनी विद्यमान नाव कायम ठेवण्याची भूमिका मांडली आहे.

#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
उरण येथील ‘भारत मुंबई कंटेनर टर्मिनल’ला जोडणारा उड्डाणपूल सुरक्षित असून जुलैअखेर दुरुस्ती पूर्ण होणार आहे; तसेच पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नाही, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
संबंधित पुलामध्ये कोणतीही संरचनात्मक त्रुटी आढळलेली नाही. पुलालगतच्या भरावाचा काही भाग खालच्या मातीच्या थरात झालेल्या नैसर्गिक स्थिरीकरणामुळे (सेटलिंग); तसेच काही प्रमाणात अतिवजनाच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे खचला असण्याची शक्यता आहे. मात्र, पुलाच्या सुरक्षिततेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
हरिनामाच्या गजरात बाल दिंडीचा सोहळा रंगला मायणी प्राथमिक शाळा मुले व मुली सहभाग | मायणी पक्षी आश्रयास्थानाच्या दुरवस्थेप्रकरणी वनविभागाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे निवेदन | ज्येष्ठ नागरिक संघ इंदापूरच्या मासिक बैठकीत ५१ सदस्यांची मोफत आरोग्य तपासणी; वाढदिवसानिमित्त गुणगौरव | राष्ट्रीय कर्तव्यात मुढेवाडीचा डंका! अहोरात्र कष्टातून 'SIR' चे काम आटपाडी तालुक्यात प्रथम पूर्ण | देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न..! | महाराष्ट्राचा 'युथ आयकॉन'! पुण्याच्या रामराजे भोसले यांना राष्ट्रीय स्तरावरील मानाचा पुरस्कार | आषाढी एकादशीनिमित्त टाकेवाडीत आरोग्य शिबिर; ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी | माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड | विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण |