नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली अखेर स्ट्रीट लाईटची व्यवस्था..

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 14 June 2026 | 👁 239 Views
नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली अखेर स्ट्रीट लाईटची व्यवस्था..
कणकवली : नांदगाव व असलदे ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांकडे मांडलेल्या विविध समस्यांची दखल घेत अखेर महामार्ग प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. नांदगाव तिठा येथील उड्डाणपुलाखालील दोन्ही पॅसेजमध्ये अंधाराचे साम्राज्य असल्याने नागरिक, वाहनचालक व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.याबाबत ग्रामस्थांनी महामार्ग अधिकाऱ्यांची भेट घेऊन उड्डाणपुलाखाली तातडीने स्ट्रीट लाईट बसविण्याची शनिवारी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी स्ट्रीट लाईट चे काम पूर्ण करत विविध ठिकाणी हॅलोजन लावल्याने लख्ख प्रकाश पडला आहे.
ग्रामस्थांच्या मागणीनंतर रविवारी महामार्ग प्राधिकरणाकडून स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात आली. नांदगाव ग्रामपंचायत मार्फत चार हॅलोजन देण्यात आले होते. त्यामुळे आता नांदगाव उड्डाणपुलाखालील दोन्ही पॅसेजमध्ये लख्ख प्रकाश होणार असून रात्रीच्या वेळी महिलांना ,कॉलेज मधील मुलींना,नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीपासून दिलासा मिळणार आहे.या कामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
झापाचीवाडी हद्दीतील ओढ्यावरील काम निकृष्ट दर्जाचे; टेंडरबाह्य साहित्य वापरल्याचा आरोप , मृदा व जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष | पोलीस आयुक्त एम. राजकुमार साहेब यांनी केले अंबिका नगर च्या विध्यार्थ्यांचे स्वागत | शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी व शिक्षण विभागाचा जिल्हाभर जल्लोषमय दौरा; विद्यार्थ्यांच्या स्वागताने दुमदुमल्या जिल्हा परिषद शाळा | डाळिंबाच्या ‘कॅलिफोर्निया’ची यशोगाथा आता इयत्ता सहावीच्या भूगोल पुस्तकात; राज्यभर गाजले अजनाळे | आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र घोषीत | आषाढी यात्रा कालावधित कलम 163 चे घोषणापत्र जारी | माळशिरस वाहन अपघात-जिल्हाधिकाऱ्यांकडून 'चौकशी समिती' गठीत, | "वीज बिल माफीच्या घोषणा आणि प्रत्यक्षात अंधाराचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत जवळ" | आरामबसमध्ये दारूचा साठा करूळ नाक्यावर पोलिसांचा दणका | चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत मधुरा बाईतचे यश |