एन.एम.एम.एस. परीक्षेत आदिती दगडेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; पाचवडच्या जयभवानी विद्यालयाची अभिमानास्पद कामगिरी

👤 दै आखुर मायणी | 📅 29 April 2026 | 👁 108 Views
एन.एम.एम.एस. परीक्षेत आदिती दगडेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; पाचवडच्या जयभवानी विद्यालयाची अभिमानास्पद कामगिरी
एन.एम.एम.एस. परीक्षेत आदिती दगडेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; पाचवडच्या जयभवानी विद्यालयाची अभिमानास्पद कामगिरी

मायणी : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवड येथील जयभवानी विद्यालयाची विद्यार्थिनी आदिती मोहन दगडे हिने भटक्या जमाती (क) प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशासाठी आदितीला एस. जे. लिंगे, डी. पी. घाडगे, पी. डी. घाडगे, ए. पी. पळे, ए. व्ही. साखरे, एस. एस. रोकडे आणि जी. व्ही. कोळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशामुळे विद्यालयासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एन.एम.एम.एस. शिष्यवृत्तीअंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत दरवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे एकूण चार वर्षांसाठी 48 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
आदितीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, जिल्हा परिषद सदस्य सूरज पाटील, संस्थेचे चेअरमन रघुनाथ आबा घाडगे, सचिव तुषार घाडगे, मुख्याध्यापक शेलार सर, न्यूरोसर्जन डॉ. अमोल सुडके, यशोदीप सोसायटीचे चेअरमन मोहन दगडे, विठोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रघुनाथ कचरे, राजू कचरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |