पांगरीत मेंढपाळाच्या वाड्यावर 'माजी मंत्र्यांचा' मुक्काम!

👤 आकाश दडस | 📅 11 May 2026 | 👁 166 Views
पांगरीत मेंढपाळाच्या वाड्यावर 'माजी मंत्र्यांचा' मुक्काम!
चर्चेचा विषय एकीकडे राजकीय नेते मोठ्या हॉटेल्स आणि बंगल्यांमध्ये वास्तव्य करत असताना, जानकरानी मात्र जमिनीवर झोपून मेंढपाळांशी नाळ जोडल्याने संपूर्ण माढा मतदारसंघात आणि सोशल मीडियावर त्यांच्या या साधेपणाचे मोठे कौतुक होत आहे.
राजकारणाच्या झगमगाटापासून दूर, कडाक्याच्या उन्हात आणि रानावनात आयुष्य व्यतीत करणाऱ्या मेंढपाळांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष मा. महादेवजी जानकर यांनी चक्क मेंढरांच्या वाड्यावर मुक्काम केला. माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुरू असताना, माण तालुक्यातील पांगरी येथे त्यांनी हा अनोखा अनुभव घेतला.

थेट माळरानावर विसावा

रासपचे माण तालुका युवक अध्यक्ष तात्याराम दडस यांच्या शेतात मेंढरांचा वाडा आहे. कोणत्याही विशेष सोयीसुविधांची अपेक्षा न ठेवता, जानकर साहेब थेट या वाड्यावर पोहोचले. मोकळ्या माळरानावर, मेंढपाळांसोबत जमिनीवर बसून त्यांनी त्यांच्या रोजच्या संघर्षाची, ऊन-वारा-पाऊस झेलत जगणाऱ्या जीवनाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी स्वतः मेंढपाळांसारखेच साधे जेवण करून तिथेच रात्रीचा मुक्काम केला.

५० वर्षांपूर्वीचे बालपण आठवले!

या अनुभवाबद्दल बोलताना महादेव जानकर भावूक झाले होते. ते म्हणाले, "आज मेंढपाळांसोबत या माळरानावर मुक्काम करताना मला माझ्या ५० वर्षांपूर्वीच्या बालपणाची आठवण झाली. मी पुन्हा एकदा माझ्या त्या संघर्षमय जीवनाचा भाग झालो असे मला वाटते. मेंढपाळांचे कष्ट मी जवळून पाहिले आहेत, म्हणूनच त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ओढ कायम असते."


मेंढपाळांसाठी 'मसिहा' ठरलेले मंत्री
महादेव जानकर यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात मेंढपाळांसाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले होते. मेंढपाळांना विमा संरक्षण देणे, मेंढ्यांचा विमा उतरवणे आणि शेळी-मेंढीसाठी निवारा सुरू करणारे ते पहिलेच मंत्री ठरले. आजही साधनसामग्रीचा कोणताही बडेजाव न मिरवता, गेल्या ३५-४० वर्षांपासून ते आपला पक्ष आणि सामाजिक कार्य पुढे नेत आहेत, अशी माहिती रासप महाराष्ट्र सरचिटणीस शरद दडस यांनी दिली.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
संबंधित यंत्रणांनी रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात - जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन | राज्यातील स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्तीवेतन पेन्शनधारकांनी संबंधित तहसिल व तलाठी कार्यालयाकडे कागदपत्रे तात्काळ जमा करावेत | आशा वर्कर, आरोग्य सेवकांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्या! | सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील - नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद | रेड झोनची सीमा तातडीने जाहीर करा-शिवसेना नगरसेवक ऐश्वर्या राजेंद्र तरस | शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा जपणे ही काळाची गरज – डॉ. आर. एस. बनसोडे | जनतेचा विश्वास, विकासाची आस — निमोण-समनापूर गटात कविता कैलास पाटील यांची दमदार दावेदारी! | कलाकाराची उपेक्षा! ४० वर्षे सुरांची सेवा, पण शासनाकडून मानधनाचा पत्ताच नाही! | संभाजी राजे शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समितीच्या सदस्य पदी निवड. पंढरपूर विभागामध्ये आनंदी आनंद | उबाठा खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती, म्हणाले, उत्तम मंत्री…! |