तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे.

👤 संतोष एडके तासगाव | 📅 06 October 2026 | 👁 5 Views
तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन  : तहसीलदार अतुल पाटोळे.


दैनिक आखुर /संतोष एडके तासगाव

तासगाव : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यभरात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तासगाव तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजना व सेवांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी निमणी ग्रामपंचायत कार्यालय येथे गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘सेवा सेतू’ अभियानाचे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत नागरिकांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ तसेच आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शिबिरात प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, ‘जिवंत सातबारा’ मोहीम, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र तसेच इतर महसुली दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच वनहक्क दावे मंजूर करून अधिकार अभिलेख तयार करणे, मालमत्ता हस्तांतरण नोंदी, नवीन नळजोडणी व घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महिला शेतकरी प्रमाणपत्र, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र, आधार नोंदणी तसेच आधार अद्ययावत करणे आदी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय ७/१२ व ८-अ उताऱ्यांवरील नोंदी अद्ययावत करणे तसेच जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोजणीशी जोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
तासगाव तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन शासकीय योजनांचा व विविध सेवांचा फायदा घ्यावा, असे आवाहन तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सिद्धी सूर्यवंशीची राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी निवड | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | सांगली एलसीबीची विशेष मोहीम; पारधी समाजातील १४ पाहिजे, फरारी आरोपी पोलिसांसमोर हजर. | वडजी येथील तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास भडगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा | *महाराष्ट्र चे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर* | ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ... | मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत यांचे निधन | भडगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे सुरू | खुल्या जिल्हा कारागृहाला मंजुरी; बिलाखेड शिवारात होणार उभारणी |