आमडी गावातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

👤 नितिन बोरसरे, रामटेक, नागपूर | 📅 16 October 2026 | 👁 14 Views
आमडी गावातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
रामटेक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, तसेच राज्यमंत्री आमदार आशिष जयस्वाल यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत रामटेक तालुक्यातील आमडी गावातील अनेक युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यमंत्री आमदार आशिष जयस्वाल यांच्या रामटेक येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी तालुका प्रमुख राजू भोसकर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी युवकांचा वाढता प्रतिसाद आणि विश्वास ही संघटनेची खरी ताकद असल्याचे सांगितले. युवकांच्या हक्कांसाठी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि समाजाच्या हितासाठी शिवसेना सदैव खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यात पारशिवणी तालुक्यातील आमडी गावातील नकुल सलामे, मयूर केळवदे, आकाश धुर्वे, राकेश डायरे, आझाद केळवदे, रोहित डडोरे, विशाल केळवदे, चेतराम केळवदे, दिलीप टेकाम, विनोद सोनवाने, फुलचंद देऊळकर, उमेश लोहारे, जगदीश शिवरकर, अनिल शाह, महेश केळवदे, नंदकिशोर बावणे, आकाश बोरीकर आणि आकाश वाघमारे यांच्यासह अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि राजू भोसकर यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या युवकांचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन केले.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आमडी गावातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश | शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदणी पूर्ण करावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन | न्यायालयाच्या दारातच न्यायासाठी लढा: भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे ‘काळी फीत’ लावून मूक आंदोलन | वागदर्दी धरणात दुर्दैवी घटना; बैल धुण्यासाठी गेलेल्या डोणगावच्या राहुल सोमसे यांचा मृत्यू | आईने २० रुपये दिले नाहीत; रामटेक तालुक्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू | शाळेतून घरी परतण्याचा प्रवास एका विद्यार्थ्यासाठी अखेरचा ठरला | चांदवड तालुक्यात १४ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीची प्रसूती; नवजात बालिकेसह जिल्हा रुग्णालयात हलविले* | कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या ग्रामस्थांचा इशारा | तहसीलदार अतुल पाटोळे यांची विभागीय चौकशी करा | लग्नाला अवघे ५ महिने, नवविवाहित दाम्पत्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या! |