शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदणी पूर्ण करावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन

👤 शुभम पानसरे निफाड | 📅 16 October 2026 | 👁 3 Views
पिंपळगाव बसवंत, निफाड : निफाड तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध योजना, अनुदान आणि आर्थिक मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी आवश्यक कागदपत्रे व नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यामध्ये खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पूर्ण करणे, फार्मर आयडीसाठी नोंदणी करणे, पात्र महिला शेतकऱ्यांनी शेतकरी महिला प्रमाणपत्र मिळवणे आणि प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करणे या कामांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी विहित मुदतीत करून घ्यावी. तसेच फार्मर आयडीसाठी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक मिळवावा. पात्र महिला शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्रमाणपत्र काढून घ्यावे. ई-केवायसी बाकी असलेल्या लाभार्थ्यांनीही ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. अपूर्ण कागदपत्रांमुळे लाभापासून वंचित राहू नका शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नोंदी अद्ययावत असणे आवश्यक आहे. नोंदणी किंवा ई-केवायसी अपूर्ण असल्यास भविष्यात अनुदान अथवा मदत मिळवताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण करावीत. गावातील पात्र शेतकरी कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कागदपत्रांच्या अभावामुळे शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांनी आपल्या शेजारील शेतकरी बांधवांनाही या प्रक्रियांची माहिती देऊन जनजागृती करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आवश्यक नोंदणी आणि कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय मदतीसाठी पात्रतेनुसार लाभ घेण्याच्या दृष्टीने सज्ज राहावे, असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी स्पष्ट केले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदणी पूर्ण करावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन | न्यायालयाच्या दारातच न्यायासाठी लढा: भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे ‘काळी फीत’ लावून मूक आंदोलन | वागदर्दी धरणात दुर्दैवी घटना; बैल धुण्यासाठी गेलेल्या डोणगावच्या राहुल सोमसे यांचा मृत्यू | आईने २० रुपये दिले नाहीत; रामटेक तालुक्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू | शाळेतून घरी परतण्याचा प्रवास एका विद्यार्थ्यासाठी अखेरचा ठरला | चांदवड तालुक्यात १४ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीची प्रसूती; नवजात बालिकेसह जिल्हा रुग्णालयात हलविले* | कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या ग्रामस्थांचा इशारा | तहसीलदार अतुल पाटोळे यांची विभागीय चौकशी करा | लग्नाला अवघे ५ महिने, नवविवाहित दाम्पत्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या! | शिरोशीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप |