ईश्वरपूर : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६-२७ साठी ईश्वरपूर येथील श्री शिवाजी उदय मंडळाची खेळाडू कु. सिद्धी विशाल सूर्यवंशी हिची निवड झाली आहे.
पालघर येथे होणाऱ्या ५३व्या कुमारी राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी सिद्धीची निवड झाल्याने ईश्वरपूरसह सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सिद्धीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री शिवाजी उदय मंडळ, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. राज्यस्तरावरही दमदार कामगिरी करून सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासाठी तिला क्रीडा प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांची खंबीर साथ लाभली.