*महाराष्ट्र चे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर*

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 05 October 2026 | 👁 15 Views
*महाराष्ट्र चे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर*
जळगाव, दि.5) : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एरंडोल तालुक्यातील पातरखेडे येथील शेतकरी मधुकर पाटील यांच्या शेतात भेट देऊन कपाशी आणि मका पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांची सद्यस्थिती तसेच पिण्याचे पाणी, पीक पेरा आणि इतर अडचणींची माहिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.या पहाणी दौ-यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड (एरंडोल), संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.शेताची पाहणी करतांना मंत्री बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर बसून पिठलं, भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावात उपस्थित राहून काम करीत आहेत. तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारी पर्यंत तसेच कृषी सहायकापासून ते विभागातील अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दुष्काळी परिस्थिती असेपर्यंत प्रशासनाने सतर्क व तत्पर राहून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना फोन न करण्याच्या सूचना

बँकांकडून अपेक्षेच्या तुलनेत नवीन कर्जवाटप कमी झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कर्जवाटपाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहकारी, राष्ट्रीयकृत तसेच खासगी बँकांनी शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी फोन करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अवैध सावकारी विरोधात कारवाईचे निर्देश

एरंडोल, यावल आणि रावेर तालुक्यांत अवैध सावकारी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अवैध सावकारी विरोधात नियमानुसार कारवाई करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्यात..
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
वडजी येथील तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास भडगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा | *महाराष्ट्र चे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर* | ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ... | मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत यांचे निधन | भडगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाचे पंचनामे सुरू | खुल्या जिल्हा कारागृहाला मंजुरी; बिलाखेड शिवारात होणार उभारणी | *खासगी पंटरमार्फत २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळचे पोलिस हवालदार निलंबित* | *कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे; जळगावच्या 'हेवन कॅफे' मालकाविरुद्ध गुन्हा दाखल* | *दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या व गिरणा नदी पात्रावरील अवैध्य वाळूचा उपसा थांबवा या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चा* *चे जिल्हाधिकारी यांना निवेदन* | चोरीस गेलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; तासगाव पोलिसांची कारवाई १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने हक्कदाराच्या स्वाधीन |