शारदा स्कूल भक्तीरसात न्हालं; पावसाच्या सरींमध्ये विठ्ठलनामाचा अखंड जयघोष

👤 गणेश डेंगळे,अहिल्यानगर | 📅 24 July 2026 | 👁 270 Views
शारदा स्कूल भक्तीरसात न्हालं; पावसाच्या सरींमध्ये विठ्ठलनामाचा अखंड जयघोष
सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, शारदानगर येथे आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांची भव्य दिंडी काढण्यात आली. विशेष म्हणजे, रिमझिम पावसाच्या सरी सुरू असतानाही बालगोपालांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदा हरि विठ्ठल" आणि "माऊली माऊली" अशा अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी हातात टाळ, मृदंग, पखवाज आणि भगवे पताके घेऊन विठ्ठलभक्तीचा संदेश दिला. पावसाच्या सरी अंगावर झेलत बालवारकऱ्यांनी काढलेली दिंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावरील भक्तिभाव, शिस्तबद्ध सहभाग आणि विठ्ठलनामाचा गजर यामुळे परिसरात पंढरपूरची अनुभूती निर्माण झाली.यावेळी शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, उपप्राचार्या शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका सौ. प्रज्ञा पहाडे, शिक्षिका पल्लवी ससाणे, नैथलीन फर्नांडिस तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या विचारांचा वारसा आणि विठ्ठलभक्तीचे संस्कार यांविषयी मार्गदर्शन केले.दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि विठ्ठलनामाचा अखंड जयघोष करत भक्तिमय वातावरण निर्माण केले. पावसाच्या सरी आणि विठ्ठलनामाचा निनाद यांचा अनोखा संगम अनुभवत उपस्थित पालक, शिक्षक आणि नागरिकही भारावून गेले. संस्कार, अध्यात्म आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना करून देणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |